अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त अमळनेर शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडली. सामाजिक ऐक्य आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शहरासह परिसरातील शेकडो धावपटूंनी सहभाग नोंदवला.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पीएसआय काकडे, पत्रकार किरण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, सिद्धार्थ शिसोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध वयोगटातील युवक, युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पुरुष गटात तेसज सपकाळे (नाशिक) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर धडगाव येथील खुमानसिंग ठाकरे यांनी तृतीय क्रमांक मिळवून आपली छाप पाडली. विजेत्यांना अनुक्रमे ७००० रुपये, ५००० रुपये व ३००० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
महिला गटातही स्पर्धा चुरशीची ठरली. उन्नती पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५००० रुपये, ३००० रुपये व २००० रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. महिला सहभाग लक्षणीय ठरला असून, यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव, अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव, सुनील वाघ, सुनील करंदीकर, गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, प्रा. कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील, भिका संदानशिव, राजेंद्र संदानशिव, समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव, जितेश संदानशिव, तुषार संदानशिव, परम चव्हाण, शुभम घोलप, अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे, सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव, संदीप संदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील आदींनी आयोजनात मोलाचे योगदान दिले. तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता जाधव, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण, गौतमी चव्हाण आदी उपस्थित होते.



