Home Uncategorized डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक होमिओपॅथी दिनाचे औचित्य साधून गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण २४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
शिबिराचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी मानवी जीवनात रक्तदानाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले, तसेच सामाजिक कर्तव्य पार पाडल्याबद्दल महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पंकज शर्मा, डॉ. विपुल साळुंखे, डॉ. भूषण यांच्यासह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि इंटर्न विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रक्तपेढीच्या डॉ. स्वाती मिश्रा, समन्वयक लक्ष्मण पाटील, दिनेश भोळे, रुपेश कुलकर्णी, ज्योती खळसे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्व आयोजकांचे व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे


Protected Content

Play sound