रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोतवाल वाडा परिसरात ‘माझ्याकडे का पाहतो?’ असे विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत एका तरुणाचा दात पडला असून त्याच्या आईलाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्ताफ खान मोहम्मद ईस्माईल खान (वय ४४, रा. कोतवालवाडा) हे आपल्या घराबाहेर असताना आरोपी सय्यद अर्शद सय्यद बिलाल याच्याशी त्यांची नजरानजर झाली. यावेळी अल्ताफ यांनी ‘तू माझ्याकडे काय पाहतो?’ असे विचारले. या साध्या प्रश्नाचा राग मनात धरून आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले.

यावेळी संशयित आरोपी सय्यद अर्शद याने लाठीने अल्ताफ यांच्या कपाळावर वार केला. भांडण सोडवण्यासाठी अल्ताफ यांची आई ताहेराबी धावून आली असता, त्यांनाही जोरात बुक्का मारला, ज्यामध्ये त्यांचा एक दात पडून त्या गंभीर जखमी झाल्या. इतर आरोपींनी यावेळी शिवीगाळ करत फिर्यादी आणि त्यांच्या आईला ‘आज तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.
या घटनेनंतर अल्ताफ खान यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सय्यद अर्शद सय्यद बिलाल, सय्यद इक्बाल खान इमाम खान, सय्यद खालीक सय्यद बिलाल आणि सय्यद फरीद सय्यद निजामउद्दीन यांच्या विरोधात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक समाधान ठाकूर हे करीत आहे.



