पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीच्या वारस हक्काच्या पैशांच्या वादातून एका महिलेला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची घटना जामनेर तालुक्यातील मांडवा खुर्द परिसरात घडली आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरिदाबी शेख शरीफ खाटीक (वय ५८, रा. सिट फार्म, मुक्ताईनगर) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास फरिदाबी शेख त्या जामनेर तालुक्यातील मांडवा खुर्द येथील कब्रस्तान जवळून जात होत्या. यावेळी शेतीच्या हिश्याचे आणि वारस हक्काच्या पैशांच्या कारणावरून संशयित आरोपी शेख रईस शेख सरदार खाटीक व त्यांचे सहकारी यांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाल्या.

त्यानुसार त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख रईस शेख सरदार खाटीक, शेख अरबाज शेख शकील खाटीक, अल्ताफ नजीम कुरेशी, कालु रसुल शहा, बालु कालु पटेल, शेख जमील शेख अकील, शेख शकील शेख सरदार खाटीक (सर्व राहणार फत्तेपूर, ता. जामनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते हे करीत आहे.



