Home Cities चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दिलीप घोरपडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

सह्याद्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दिलीप घोरपडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

0
33

dilip ghorpade

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वृत्तपत्रकार मित्र मंडळाच्या आज दि.29 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत, लाईव्ह ट्रेंडस् न्युजचे प्रतिनिधी दिलीप घोरपडे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, जेष्ठ पत्रकार व मंडळाचे सल्लागार किसनराव जोर्वेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे सेक्रेटरी एम.बी.पाटील, उपाध्यक्ष संजय सोनार, मंगेश शर्मा, कार्याध्यक्ष मनोहर कांडेकर, कोषाध्यक्ष आंनद शिंपी यांच्यासह पत्रकार रमेश जानराव, सी.सी. वाणी, भिकन वाणी, स्वप्निल वडनेरे, जिजाबराव वाघ, मुराद पटेल, मनोज पाटील, हेमराज पाटील, सुनील राजपूत, निंबा सोनार, अनिल शिरसाट, गणेश पाटील, गणेश पवार, शरद पाटील, नारायण जेठवानी, गणेश पवार व संजय चौधरी आदी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound