Home Cities जळगाव कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल अनिल सुरडकर यांचा गौरव

कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल अनिल सुरडकर यांचा गौरव


जळगाव, लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल जी. सुरडकर यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पंचायत समिती, चोपडा येथे पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, कास्ट्राईब कर्मचारी संघटना जिल्हा जळगावच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अनिल सुरडकर यांनी आजवर संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी अत्यंत कर्तव्यदक्षपणे कार्य केले आहे. त्यांच्या याच कामाची आणि अनुभवाची दखल घेत त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक भोई, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पगारे यांच्यासह कनिष्ठ प्रशासन अधिकारी डी. ए. चिंचोरे, जितेंद्र जावळे, नारायण तुपकर, राकेश शिसोदे, दीपक पांढरे आणि राजपूत यांच्यासह अनेक सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या नवीन पदाच्या माध्यमातून सुरडकर हे प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षमतेने करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.


Protected Content

Play sound