Home क्राईम डीजेच्या तालावर राडा ; वादात पडलेल्या तरुणाच्या मांडीत चाकू आरपार !

डीजेच्या तालावर राडा ; वादात पडलेल्या तरुणाच्या मांडीत चाकू आरपार !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील डेपिर बाबा दर्गा परिसरातील मोकळ्या जागेत दोन गटांत झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना बुधवारी २५ मार्च रोजी रात्री १० वाजता घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील घोडेपिर बाबा दर्गा येथील मोकळ्या जागेत ४ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास डीजे वाजत होता. यावेळी शिवपूर कन्हाळा येथील लोकांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करू लागले. मोहम्मद अल्फेश मोहम्मद अशरफ वय १८ हा तरुण हा वाद होत असताना बाजूला होण्याचा प्रयत्न करत होता. संशयित आरोपी जावेद गट्टु गवळी रा. शिवपूर कान्हाळा याने आपल्या हातातील चाकूने समोरील व्यक्तीवर वार करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, हा वार मोहम्मद आल्फेश याच्या डाव्या पायाच्या मांडीत खोलवर आरपार घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जावेद गट्टु गवळी रा. शिवपूर कान्हाळा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound