Home Cities जळगाव जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तैलचित्र अनावरण सोहळा

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तैलचित्र अनावरण सोहळा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एक विशेष गौरव सोहळा संपन्न झाला. बाजार समितीचे माजी सभापती स्व. सिताराम सोनवणे आणि संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी क्षेत्र आणि संसदीय कार्याचा गौरव करण्यात आला.

शेतकरी हिताचा १५ वर्षांचा प्रवास
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी माजी सभापती स्व. सिताराम सोनवणे यांच्या कार्याला उजाळा दिला. सोनवणे यांनी तब्बल १५ वर्षे सभापती म्हणून बाजार समितीची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. “शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि बाजार समितीच्या विकासात त्यांचे असलेले योगदान आजही मार्गदर्शक आहे,” अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या कार्याचे कौतुक
कार्यक्रमात विद्यमान खासदार स्मिताताई वाघ यांच्या संसदीय कार्याचाही विशेष गौरव करण्यात आला. संसद भवनात त्यांनी मांडलेले प्रभावी प्रश्न आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मिळालेला ‘संसदरत्न’ पुरस्कार, याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीला मिळावा, या उद्देशाने त्यांचे तैलचित्र सभागृहात लावण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला डॉ. शांताराम सोनवणे, संचालक प्रभाकरअप्पा सोनवणे, विद्यमान चेअरमन सुनील महाजन, वसंतराव सोनवणे, माजी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, प्रा. डॉ. राजू पाटील, अशोक राठी, संभाजी सोनवणे, अनिल सोनवणे, सचिव कैलास शिंदे आणि इंद्रराज सपकाळे यांच्यासह कृउबाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound