Home क्राईम माझ्या मुलाला न्याय द्या !; पालकांची आर्त हाक, आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीसांना...

माझ्या मुलाला न्याय द्या !; पालकांची आर्त हाक, आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीसांना निलंबित करा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आणि आरोपींना मदत केल्याचा खळबळजनक आरोप मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी जामनेर विभागाबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत व्हावी, या मागणीसाठी पालकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना सोमवार २३ मार्च रोजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले आहे.

जामनेर शहरातील जामनेर पुरा या भागात राहणारा प्रशांत दिलीप वाघ या तरुणाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, प्रशांत वाघ याने गावातील सावकार असलेल्या अजय प्रभाकर पोळ याच्याकडून काही पैसे उधारीने पैसे घेतले असावे, पैशांवरून पोळ याच्याकडून वारंवार मानसिक छळ केला जात होता. याला कंटाळून प्रशांत याने टोकाचं पाऊ उचललं आहे. अजय पोळ याने प्रशांतच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून त्याला मानसिक त्रास दिला होता, ज्याचा उल्लेख प्रशांतने मृत्यूपूर्वी केल्याचे समजते.

मयत प्रशांतच्या वडिलांनी, दिलीप रामा वाघ यांनी दिलेल्या निवेदनात पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि पोलीस शिपाई सचिन महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात प्रशांतच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय पोळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर १३ दिवस उलटूनही मुख्य आरोपी अजय पोळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आता गुन्हा दाखल असूनही संशयित आरोपीला पोलीसांनी अद्यात अटक केलेली नाही. दरम्यान जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी कुटुंबियांना आपसात मिटवून देण्याचा सल्ला दिला आहे असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच पोलीस शिपाई सचिन महाजन व इतर पोलीस कर्मचारी हे संशयित आरोपीला पळून जाण्यासाठी मदत करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी. फरार झालेल्या संशयित आरोपीला अटक करण्यात यावी, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि पोलीस नाईक सचिन महाजन यांना निलंबित करण्यात यावे असे या निवेदनात नमूद केले आहे.


Protected Content

Play sound