Home आरोग्य मोफत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद ; २०० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ!

मोफत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद ; २०० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ!

0
155


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरोग्य सेवेचा वसा जपत, जळगाव तालुक्यातील भोकर येथे आयोजित करण्यात आलेले ‘मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात परिसरातील २०० पेक्षा जास्त रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.

भोकर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘कांताई नेत्र संजीवनी योजने’ अंतर्गत आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. ज्या रुग्णांना मोतिबिंदूचे निदान झाले आहे, त्यांच्यावर जळगाव येथील प्रसिद्ध ‘कांताई नेत्रालय’ येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सुकदेव सोनवणे यांच्या पुढाकाराने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातून आजवर हजारो रुग्णांना विविध व्याधींपासून मुक्तता मिळाली असून, गरजवंतांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

याप्रसंगी बोलताना प्रा. सोनवणे म्हणाले की, “भविष्यातही कोणाला कोणत्याही प्रकारच्या व्याधी किंवा आरोग्याच्या समस्या असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा, त्यांना योग्य ते उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अशोक पाटील, प्रभाकर कोळी, नंदलाल सोनवणे, दिलीप बाविस्कर, हरीश पवार, दिलीप पवार, किशोर पवार, लोटन सोनवणे, संदीप पाटील, सुकदेव बाविस्कर, योगेश कोळी, धनराज वारडे, समाधान वाघ, विलास सोनवणे, एकनाथ सैंदाने आणि विशाल सोनवणे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound