Home क्राईम अश्लिल चाळे करत विवाहितेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

अश्लिल चाळे करत विवाहितेचा विनयभंग ; गुन्हा दाखल


जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून तिला अश्लील इशारे करणे आणि घरात घुसून “माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुला व तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. पीडीत महिला १३ मार्च रोजी सकाळी गावातून पायी जात असतांना संशयित आरोपी अनिल पांडूरंग पाटील याने पिडीत महिलेकडे पाहून अश्लिल इशारे केले. एवढ्यावरच न थांबता, १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जेव्हा पीडिता घरात एकटी होती, तेव्हा आरोपीने घरात प्रवेश करत पिडीत विवाहितेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीत विवाहितेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल पांडुरंग पाटील याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound