Home क्राईम किरकोळ वादातून तुफान राडा; लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला !

किरकोळ वादातून तुफान राडा; लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादाची खुन्नस मनात धरून आणि किरकोळ शिवीगाळीचे निमित्त साधून जळगाव तालुक्यातील आसोदा येथे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत ७ जणांनी मिळून एकाला त्यांच्या पत्नीला आणि भावाला बेदम मारहाण केली असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी अमजद समद शेख (वय ४२) हे १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर असताना, आरोपींनी जुन्या वादातून त्यांना गाठले. बेकायदेशीर मंडळी जमवून आलेल्या ७ जणांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमजद शेख यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकून गंभीर दुखापत केली. तसेच त्यांची पत्नी व भावाला देखील लाकडी काठ्यांनी व बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घराबाहेर उभी असलेली दुचाकी (MH १९ AL ६७४४) आणि पॅजो रिक्षा (MH १९ BH ७९५) यांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून नुकसान केले. याबाबत सलीम शेख, मुस्ताक शेख, सलीम शेख (दुसरा), मेहमूद शेख, शेख निमनु शेख, शहबाज शेख आणि रियाज मुनाफ शेख (सर्व राहणार आसोदा) अशा एकूण ७ जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound