Home क्राईम  इलेक्ट्रिक पोलवर शॉक लागून युवकाचा दुर्दैवी मृत्यू 

 इलेक्ट्रिक पोलवर शॉक लागून युवकाचा दुर्दैवी मृत्यू 


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोरव्हाल शिवारात इलेक्ट्रिक पोलवर काम करत असताना विजेचा शॉक लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल ओंकार महाजन (वय ३२, रा. मोरव्हाल) हे शनिवारी मोरव्हाल येथील शेतातील इलेक्ट्रिक पोलवर काही कामासाठी चढले होते. यावेळी वायर तपासत असताना अचानक त्यांना विजेचा तीव्र शॉक बसला. शॉक लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत राहुल महाजन यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे मोरव्हाल गावात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेबाबत देविदास बळीराम महाजन यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून नेमकी परिस्थिती कशी घडली याबाबत चौकशी केली जात आहे.


Protected Content

Play sound