मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे. सौ. वाघ या लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली होती, त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान चित्रा वाघ यांच्यानंतर आता राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात घोषणा केली.