Home क्राईम व्हिडीओ काढल्याचा राग अनावर ; मजुराच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला

व्हिडीओ काढल्याचा राग अनावर ; मजुराच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला

0
109


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भांडणाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये का शूट केला, या कारणावरून संतापलेल्या चार अनोळखी इसमांनी एका तरूणाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून जखमी केल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता वावडदा शिवारात घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्ताप अजिज पटेल (वय २६, रा. नाचणखेडा, ता. जामनेर) हे तरुण मजूर म्हणून काम करतात. ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अल्ताप हे वावडदा येथे ‘बांधकाम कामगार योजने’ अंतर्गत मिळणारे साहित्य घेण्यासाठी गेले होते. त्याच ठिकाणी त्यांचे गावाशेजारी राहणारे मित्र आणि काही अनोळखी व्यक्तींमध्ये वाद सुरू होता.

हा वाद पाहून अल्ताप पटेल यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. आपल्या कृत्याचा व्हिडीओ काढला जात असल्याचे पाहून संशयित आरोपींना राग अनावर झाला. त्यांनी तातडीने अल्ताप यांना गाठले आणि व्हिडीओ काढल्याचा जाब विचारत त्यांना चापटबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईप टोक्यात टाकून मारहाण केली. हा प्रकार समोर घडल्यानंतर अल्ताप पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल समाधान टहाकळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound