Home Cities अमळनेर भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू; गुन्हा दाखल

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू; गुन्हा दाखल


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहिवद गावाजवळ एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका ४८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर शनीवारी ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील वीटनेर गावातील रहिवाशी पंढरीनाथ विठ्ठल पाटील (वय ४८) हे अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावाकडून दहिवद गावाकडे पायी जात होते. यावेळी दहिवद गावाच्या काही अंतरावर समोरून येणाऱ्या एका भरधाव दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीझेड १६४०)ने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पंढरीनाथ पाटील यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र जखम खोल असल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विटनेर आणि दहिवद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound