Home क्राईम लहान मुलांच्या भांडणावरून कुटुंबातील चौघांना मारहाण !

लहान मुलांच्या भांडणावरून कुटुंबातील चौघांना मारहाण !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून कुटुंबातील चौघांना शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अन्वरउल्ला शेख रूउल्ला वय ४५ रा. मनियार वाडा, नशिराबाद हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २ मार्च रोजी रात्री ८ वाजता गावात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शेख अन्वरउल्ला व त्यांच्या पत्नी, मुलगा आणि पुतण्या यांना शरीनबी अफसर खान, अफसर खॉन शेर खॉन दोन्ही रा. नशिराबाद यांनी शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर शेख अन्वरउल्ला यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या दोघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound