पुणे (वृत्तसंस्था) जळगाव जिल्ह्यातील गड किल्ले संवर्धनाची चळवळ अधिक पणे मजबूत करणारे दिलीप घोरपडे यांची नुकतीच सह्याद्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात महावीर चक्र विजेते दिगेंद्र सिंग कुमार व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्री. घोरपडे यांनी अध्यक्षपदाचा दि. 26 जुलै रोजी पदभार स्वीकारला.
पिंपरी चिंचवड येथील येथील रामकृष्ण मोरे सभागृह दिनांक सह्याद्री प्रतिष्ठान या महाराष्ट्रभर दुर्ग-संवर्धन करणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षपदावर चाळीसगावचे भूमिपुत्र खान्देशात गड किल्ले संवर्धनाची चळवळ अधिकपणे मजबूत करणारे दिलीप घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीची घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी केली.
कारगिल विजय दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘शौर्य तुला वंदितो’ या कार्यक्रमात कारगील युद्धात 48 पाक सैनिकांना यमसदनी पाठवणाऱ्या महावीर चक्र विजेते दिगेंद्र सिंग कुमार व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अध्यक्षपदाचा पदभार घोरपडे यांना शिवप्रतिमा व घोरपडे घराण्याची मानाची तलवार देऊन देण्यात आला. यावेळी सभागृहात महाराष्ट्रातील तमाम दुर्ग सेवक दुर्ग सेविका व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.