यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील नायगाव येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून दुदैवी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. याबाबत गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दगडू लोटन पाटील वय ५३ रा. नायगाव ता. यावल असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील नायगाव येथे दगडू पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान मंगळगावरी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ते राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान नायगाव शिवारातील शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह मिळून आला. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह यावल येथील रूग्णालयात दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार हे करीत आहे.




