Home क्राईम वाळूने भरलेला डंपर पोलीसांनी पकडला; गुन्हा दाखल

वाळूने भरलेला डंपर पोलीसांनी पकडला; गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलावरून वाळूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या डंपरवर एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास म्हसावदकडून वावडदाकडे जाणाऱ्या रोडवर रेल्वे उड्डाणपुलाजवळ विना क्रमांकाचा डंपर पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी या डंपरची तपासणी केली असता, त्यात सुमारे ५ ब्रास वाळू विनापरवाना आणि चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलीसांनी वाळूचा डंपर ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक कृष्णा जगन्नाथ पवार वय ४३ रा. हर्सुल परिसर, छत्रपती संभाजी नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल समाधान टहाकळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound