Home Uncategorized अवैध गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई; नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

अवैध गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई; नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

0
114

नशिराबाद लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद परिसरात अवैध गोमांस विक्री करणाऱ्या एकावर नशिराबाद पोलिसांनी सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ४० किलो गोवंश सदृश्य मांस आणि कापण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी कोयता असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील निचवास मोहल्ला परिसरात गोवंश प्राण्याची अवैध कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक योगिता एम. नारखेडे व त्यांच्या पथकाने १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली.

या कारवाईत दाऊद खान हयात खान कुरेशी (वय ६५, रा. निचवास मोहल्ला, नशिराबाद) हा इसम स्वतःच्या गोठ्याच्या आडोशाला गोवंश सदृश्य मांस जवळ बाळगताना मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ४० किलो मांस आणि एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार आरिफ कादर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरनारे हे करीत आहे.


Protected Content

Play sound