Home धर्म-समाज वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघात ‘मारुती स्तोत्र’ निरूपण कार्यक्रम उत्साहात

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघात ‘मारुती स्तोत्र’ निरूपण कार्यक्रम उत्साहात


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत ‘मारुती स्तोत्र’ या विषयावर आयोजित निरूपण कार्यक्रमात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. निरूपणकार डॉ. नितु पाटील यांनी श्री समर्थ रामदास स्वामी रचित मारुती स्तोत्राचे सखोल विवेचन करत “संपूर्ण हनुमान चरित्राचा सार म्हणजे मारुती स्तोत्र” असे प्रतिपादन केले.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाची सभा रिंग रोड, भुसावळ येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील होते, तर व्यासपीठावर सचिव सतीश जंगले, निरूपणकार डॉ. नितु पाटील, संजय चौधरी आणि भानुदास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्वप्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने झाली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात भक्तीचा ओलावा पसरला.

मारुती स्तोत्राचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. नितु पाटील म्हणाले की, हे स्तोत्र भगवान हनुमानाच्या अद्वितीय सामर्थ्य, अखंड भक्ती आणि अतुलनीय पराक्रमाचे प्रतीक आहे. नियमित पठण केल्यास मानसिक शांती लाभते, भय आणि नकारात्मकता दूर होते तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते. जीवनात यश, धैर्य आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी मारुती स्तोत्र मार्गदर्शक ठरते, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण १५ श्लोकांचे संदर्भ, त्यामागील कथा आणि त्यातून मिळणारा बोध डॉ. पाटील यांनी सविस्तरपणे उलगडून सांगितला. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंका विचारल्या, ज्यांचे समाधानकारक निरसन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे मारुती स्तोत्राचे सामूहिक पठण केले.

यावेळी रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे, भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे, दिलीपसिंग चौधरी, सुरेश बेलसरे, रमण भोगे, प्रमोद बोरोले, विजया भारंबे, ज्योती चौधरी, राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे, लोटू फिरके, अलका इंगळे, तुकाराम पाटील, सोपान नेमाडे, अशोक नेहेते, विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील, अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे, रजनी तळेले, यशवंत वारके, विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे, अरुण धांडे आदी सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते, धनराज पाटील, भास्कर खाचणे, भानुदास पाटील आणि सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. विश्वकल्याणाची प्रार्थना करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

“भक्ती म्हणजे हनुमान आणि हनुमान म्हणजे भक्ती,” असे सांगत डॉ. नितु पाटील यांनी भगवान हनुमान हे प्रभु श्रीरामांचे सर्वोच्च भक्त असल्याचे अधोरेखित केले. जगभरात प्रभु श्रीरामांपेक्षा अधिक मंदिरे भगवान हनुमानांची आढळतात, याचे कारण म्हणजे त्यांच्या भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound