चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या एका चारचाकी चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना दरेगाव शिवारात घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेली माहिती अशी की, सुनील अशोक साळुंखे (वय ४२, रा. देवघट, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे आपल्या दुचाकीने (एमएच १८ बीयू १४२१) दरेगाव जवळून जात असताना हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहन क्रमांक (एमपी ०९ डब्ल्यू ५७९०) वरील चालकाने समोरून येणारी सुनील साळुंखे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. शिवाय या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. या संदर्भात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बाबासाहेब पगारे हे करत आहेत.




