सचिन अहिर यांचा आज शिवसेनेत प्रवेश !

3sachin 20ahor1

 

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसला आज मोठा धक्का बसणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी आमदार व मंत्री सचिन अहिर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अहिर यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेचे बळ वाढणार असून मुंबईत आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे.

 

अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मला शिवसेनेत जात असल्याचा आनंद होतो आहे. सकाळी मातोश्री या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले. मी गेल्या आठवड्यात शरद पवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे जे स्थान आहे ते माझ्या हृदयात कायम राहणार आहे. मात्र अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात असे अहिर यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कामामुळे प्रभावित झालो आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सचिन अहिर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीकडून लढून पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, ते करताना त्यांनी भाजपऐवजी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. शिवसेनेकडून ते भायखळा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या एमआयएमचे वारीस पठाण हे आमदार आहेत.

Protected Content