Home प्रशासन तहसील मुक्ताईनगर येथे यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक उत्साहात

मुक्ताईनगर येथे यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक उत्साहात


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तहसील कार्यालयात आज “श्री संत मुक्ताबाई – श्री संत चांगदेव महाराज” यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. १२ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या यात्रेची यशस्वी रूपरेषा तयार करण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासन, वारकरी संप्रदायातील पदाधिकारी, मुक्ताईनगर उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शिवसेना–युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच पत्रकार व समाजसेवक उपस्थित होते.

बैठकीत भाविकांसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभागांना सूचनांचे बारीकसारीक नियोजन करण्यात आले. यात्रेच्या विविध ठिकाणी मोबाईल टॉयलेट्सची सुविधा उभारण्यास सांगितले गेले. मुक्ताईनगर बसस्थानक, यात्रास्थळ व प्रमुख ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले. चोरीसारख्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जागोजागी दुतर्फा लाईट्स बसवण्याचे निर्देश दिले.

यात्रेच्या काळात कचराकुंड, पिण्याचे पाणी व आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्याची सूचना देण्यात आली. मंदिर परिसरात मदत कक्ष उभारण्याची तसेच महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा राखण्याचे आदेश दिले गेले. चांगदेव–मेहुण रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यास बांधकाम विभागाला निर्देश देण्यात आले. यात्रेच्या कालावधीत बस सेवा नियोजनबद्ध व नियमित ठेवणे, तसेच मुक्ताईनगर–चांगदेव बससेवा अखंड सुरू ठेवण्याचे सूचनाही देण्यात आल्या.

भाविकांसाठी जागोजागी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच सुरक्षित, सोयीस्कर व सुव्यवस्थित यात्रेचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound