Home Cities जळगाव  वसंत साखर कारखान्याचे पुनर्जीवन करण्याची मागणी

 वसंत साखर कारखान्याचे पुनर्जीवन करण्याची मागणी

0
151

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कासोदा येथील वसंत साखर कारखान्याचे पुनर्निर्माण व कार्यक्षम पुनर्जीवन करण्याची मागणी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर वसंत साखर कारखाना नवनिर्माण पुनर्जीवन समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेतर्फे संबंधित आमदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. समितीने कारखान्याचे पुन्हा चालू करणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले.

निवेदन मंत्री गिरीश महाजन,  आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार राजाभाऊ, आमदार राजूमामा भोळे यांना देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव ईश्वर माधवराव पाटील तसेच प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील उपस्थित होते. समितीने कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी आणि स्थानिक रोजगारावर झालेल्या परिणामांची माहिती दिली आणि तातडीने पुनरुज्जीवनाची मागणी केली.

गिरीश भाऊ यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित सर्व प्रशासनिक व राज्यस्तरीय पाठपुरावा करण्याचे आश्वासन समितीला दिले. त्यांनी आश्वासन दिले की स्थानिक शेतकरी आणि कर्मचार्‍यांसाठी साखर कारखान्याचे कार्यक्षम पुनरुज्जीवन शक्य होईल आणि आर्थिक व सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून स्थानिक क्षेत्राला फायदा होईल.


Protected Content

Play sound