Home Cities जळगाव सैय्यद नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

सैय्यद नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
103


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा, कर्तबगार, कार्यसम्राट, सर्व वर्गांना समान न्याय देणारे स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या विमान दुर्घटनेत मुत्यू झाल्यामुळे आज 30 जानेवारी रोजी शुक्रवारी संध्याकाळी 06 : 30 वाजता भिलपुरा चौकात सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करून त्यात दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे हातात पेटत्या मेणबत्या घेऊन स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे, एकच वादा अजित दादा, परत या परत या अजित दादा परत या अशा ज़ोरदार घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थितांना अजित दादांच्या बद्दल सविस्तर माहिती देतांना दादा कामाचे माणूस होते, दादांनी नेहमी सर्व लोकांना समान न्याय दिले, वंचित, गरीब, शेतकरी वर्गाला नेहमी कल्याण केलेले असून दादांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही असे म्हटले.

या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फौंडेशन चे सै . अयाज अली नियाज अली. हाजी अब्दुल गनी, हाजी शकुर बादशाह, योगेश मराठे, रहेमत अली, कामिल खान, वसीम खडसे, रवींद्र खैरनार, नितीन शिंपी, शेख शफी, नझीर जलाल, सलमान मेहबूब,हाजी अकबर खान , प्रकाश पाटील, शेख अय्युब, करीम खान, नासिर बागवान, नंदकुमार वाणी, जावेद बागवान, हाशिम कुरेशी,रफिक रहेमान, शाहिद कुरेशी, शेख आदिल, शेख रियाजुद्दीन, अब्दुल्लाह खान, झिशान हुसैन इ. उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound