Home धर्म-समाज यावल-फैजपुरात कोळी समाजाचा डंका ; आ. अमोल जावळेंचे समाजबांधवांनी मानले आभार!

यावल-फैजपुरात कोळी समाजाचा डंका ; आ. अमोल जावळेंचे समाजबांधवांनी मानले आभार!


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत आदिवासी कोळी समाजाला योग्य प्रतिनिधित्व देऊन सत्तेत सहभागी करून घेतल्याबद्दल, यावल तालुक्यातील समाजबांधवांच्या वतीने रावेर-यावल मतदारसंघाचे आ.अमोल जावळे यांचा १५ जानेवारी रोजी कृतज्ञता सत्कार करण्यात आला.

सत्तेत समाजाचा सहभाग :
नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून यावल नगरपालिकेत सविता नन्नवरे यांना नगरसेविका म्हणून तर फैजपूर नगरपालिकेत निकीता कोळी यांना थेट उपनगराध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली. आदिवासी कोळी समाजातील कर्तबगार महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल समाजात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, निकीता प्रकाश कोळी या राज्यातील सर्वात कमी वयात शिक्षण सांभाळून समाजसेवा करणाऱ्या एकमेव उपनगराध्यक्ष ठरल्या आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

आमदारांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा :
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आदिवासी कोळी जमातीचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो समाजबांधव आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानी जमले होते. यावेळी पुष्पहार घालून आणि शाल-श्रीफळ देऊन आमदारांचा सत्कार करण्यात आला. समाजातील तरुणांना आणि महिलांना संधी देऊन आमदारांनी दिलेला शब्द पाळल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती :
या सोहळ्याला फैजपूरचे प्रकाश कोळी, भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, नंदू सोनवणे (रिधुरी), संदीप सोनवणे (वढोदा), मुकेश कोळी, जालंधर कोळी (यावल), रोहिदास कोळी (पिंप्री), किरण तायडे, प्रमोद सोनवणे, सुभाष सोनवणे, शिवा शेठ, भीमराव कोळी, सरपंच कैलास सपकाळे, नितीन सपकाळे, धनराज कोळी, नानाभाऊ कोळी, सोनु तावडे, विठ्ठल सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, अंकुश महाराज, पंकज कोळी आणि मुकेश कोळी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound