Home क्राईम संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
155


भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या परिवाराला जीवेठार मारण्याची धमकी देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. एक वर्षापुर्वी पिडीत मुलगी ही घरात एकटी असतांना संशयित आरोपी वाल्मिक दिलीप शिरसाठ याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर तुझ्या परिवाराला जीवेठार मारेल अशी धमकी दिली. त्यानुसार याच धमकीच्या आधारे पिडीत मुलीवर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत मुलीने आपल्या पालकांना घटना सांगितली. त्यानुसार तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी वाल्मिक शिरसाठ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार ह्या करीत आहे.


Protected Content

Play sound