Home Cities अमळनेर अमळनेर येथील रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

अमळनेर येथील रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

0
44

अमळनेर प्रतिनिधी । येथील रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पदभार घेतला.

या वेळी नागपूर येथील रोटरीचे प्रांतपाल डॉ. सतीश सुळे व उपप्रांतपाल विलास पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष पूनम कोचर यांनी मावळते अध्यक्ष दिनेश रेजा यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर नूतन सेक्रेटरी वृषभ परकीयांनी मावळते सेक्रेटरी पर्यांक पटेल यांच्याकडून पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष दिनेश रेजा यांनी रोटरी क्लबकडून गतवर्षी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तर नूतन अध्यक्ष पूनम कोचर यांनी आगामी वर्षभरात कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले जातील याची माहिती दिली. या वेळी नूतन सर्व रोटरी सदस्यांचे पिन लाऊन स्वागत करण्यात आले. अजय रोडगे यांनी सूत्रसंचालन तर वृषभ पारख यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound