Home Cities जळगाव मेहरूण परिसरात इब्राहिम पटेल यांचा झंझावाती प्रचार; मतदारांशी संवाद

मेहरूण परिसरात इब्राहिम पटेल यांचा झंझावाती प्रचार; मतदारांशी संवाद

0
113


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ ‘क’ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार इब्राहिम मुसा पटेल उर्फ इबा पटेल यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. मेहरूण परिसरातील पिरझादे मोहल्ला, राम नगर आणि शेरा चौक या भागांमध्ये त्यांनी डोअर-टू-डोअर प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला.

या प्रचारादरम्यान इबा पटेल यांनी युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून परिसरातील मूलभूत समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नागरी सुविधांबाबत चर्चा केली. नागरिकांनीही आपल्या अपेक्षा व अडचणी थेट उमेदवारासमोर मांडल्या.

लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत विकासाभिमुख व लोकाभिमुख कारभारासाठी मतदारांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन इबा पटेल यांनी केले. या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


Protected Content

Play sound