Home उद्योग मुक्ताईनगरमध्ये ॲम्ब्युलन्स सेवा पुन्हा कार्यरत

मुक्ताईनगरमध्ये ॲम्ब्युलन्स सेवा पुन्हा कार्यरत


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीत अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली रुग्णवाहिका सेवा आता नव्या आणि अधिक सक्षम स्वरूपात मुक्ताईनगरकरांच्या सेवेत पुन्हा एकदा दाखल होत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारी २०२६ पासून ही महत्त्वाची आरोग्यसेवा पुन्हा सुरू होत असल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात सन २०१५ पासून कार्यरत असलेली ही सुसज्ज रुग्णवाहिका सेवा कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या जीवनाचा आधार ठरली होती. आई मुक्ताईच्या कृपेने पुन्हा एकदा ही सेवा नव्या जोमाने सुरू होत असून, आपत्कालीन रुग्णवाहतूक आणि वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

कोथळी येथील  योगेश शामराव पाटील यांच्या पुढाकारातून ही सेवा आता  मामाश्री ॲम्ब्युलन्स सर्विसेस या नावाने मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यात कार्यरत राहणार आहे. अत्याधुनिक सुविधा, रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आणि तातडीची सेवा ही या ॲम्ब्युलन्स सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.

ग्रामीण व निमशहरी भागात अद्ययावत आरोग्यसेवांची मर्यादा लक्षात घेता, अशा सुसज्ज रुग्णवाहिका सेवेचे महत्त्व अधिक वाढते. अपघात, गंभीर आजार किंवा तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज असताना ही सेवा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी या सेवेचे स्वागत केले आहे.

‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन ॲम्ब्युलन्स सेवा सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने कार्यरत राहील, असे संचालक  योगेश पाटील यांनी सांगितले. आरोग्यसेवेत गुणवत्ता, तत्परता आणि विश्वासार्हता राखण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound