Home प्रशासन नगरपालिका सावदा नगरपालिका : राजेश वानखेडे गटनेते तर विजया जावळे प्रतोदपदी निवड

सावदा नगरपालिका : राजेश वानखेडे गटनेते तर विजया जावळे प्रतोदपदी निवड

0
271

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।सावदा नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनंतर आता पालिका प्रशासकीय कामकाजाला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नगरसेवकांनी बुधवारी, २४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अधिकृत गट स्थापन केला. या प्रक्रियेत माजी नगराध्यक्ष राजेश गजाननराव वानखेडे यांची ‘गटनेते’ म्हणून, तर विजया कुशल जावळे यांची ‘प्रतोद’पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मान्यता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी एकमताने हा निर्णय घेतला. या निवडीला जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, तसे पत्रही निर्गमित करण्यात आले आहे. या निवडीमुळे आता पालिकेत पक्षाची ध्येयधोरणे राबवणे आणि कामकाजात सुसूत्रता आणणे सोपे होणार आहे.

विकासासाठी संघटित होण्याचा निर्धार या निवड प्रक्रियेवेळी गटनेते राजेश वानखेडे आणि प्रतोद विजया जावळे यांच्यासह नगरसेविका रेखा वानखेडे, सिमरन वानखेडे, सीमा लोखंडे तसेच नगरसेवक विशाल तायडे व हेमंत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. “निवडणुकीनंतर आता आमचे मुख्य ध्येय सावदा शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आहे. सर्व नगरसेवक संघटितपणे शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील,” असा विश्वास राजेश वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडीनंतर सावदा शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound