पुण्यात अडीच वर्षांच्या मुलीची हत्या ; लैंगिक अत्याचाराचा संशय

Rape Child crime

 

पुणे (वृत्तसंस्था) पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून मध्यरात्रीपासून बेपत्ता असलेल्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

या संदर्भ अधिक असे की, पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील सौदागर येथील लेबर कँपमधून काल रात्री दीड वाजता अडीच वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता होताच तिच्या आई वडिलांनी तिचा शोध सुरु केला. दोन तास म्हणजेच पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा तिच्या आई वडिलांनी शोध घेतला. परंतू ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता दिली. त्यानंतर पोलीस आणि या मुलीचे आई वडीलांनी मुलीचा एकत्र शोध घ्यायला पुन्हा सुरुवात केली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास मिलिट्री कॅम्पची भिंत जवळील कंपाऊंडच्या आत पाण्याच्या खड्ड्यात या मुलीचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. प्राथमिक अंदाजानुसार चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Protected Content