Home Cities अमळनेर भरधाव दुचाकीच्या धडकेत पायी जाणारे वृध्द गंभीर जखमी !

भरधाव दुचाकीच्या धडकेत पायी जाणारे वृध्द गंभीर जखमी !

0
113

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते मंगरूळ रोडवर पायी जाणाऱ्या वृध्दाला भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघात ते जखमी झाल्याने त्यांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरण अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिकन निंबा सुर्यवंशी वय ७२ रा. आर.के.कॉलनी अमळनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ते अमळनेर ते मंगरूळ रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी रस्त्यावरील मण्यार प्लॅस्टिक जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत बुधवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२. ३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound