Home Cities जळगाव संजय सावंत यांची भाजपवर बोचरी टिका : म्हणाले…

संजय सावंत यांची भाजपवर बोचरी टिका : म्हणाले…

0
140


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) थेट आणि बोचरी टीका केली आहे.

भाजपला महाराष्ट्रात आणि विशेषतः स्थानिक पातळीवर आपले नेतृत्व सिद्ध करता येत नाही, असा थेट आरोप संजय सावंत यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, भाजपच्या स्थानिक पातळीवरील नेतृत्वामध्ये जनतेला आकर्षित करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांचे स्वतःचे स्थानिक चेहरे मतदारांसमोर चालत नाहीत.

संजय सावंत यांनी भाजपच्या रणनीतीवर सडकून टीका करताना म्हटले की, “जेव्हा भाजपला हे जाणवते की त्यांचे स्वतःचे चेहरे आणि स्थानिक नेते जनतेसमोर चालत नाहीत, तेव्हा ते इतर राजकीय पक्षांना कमकुवत करण्याचे आणि फोडण्याचे राजकारण सुरू करतात.” आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.


Protected Content

Play sound