
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यभरातील राजपूत समाजाच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्ंयासाठी राजपूत समाजाचे युवा नेते डॉ. दिपकसिंग राजपूत यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्या आणि समस्यांवर साकारात्मक चर्चा झाली.

यावेळी दिपकसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री यांनी भागवतगीता देवून सन्मान दिला. या भेटीत, राजपूत समाजाने शासनाकडे केलेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आल्या. डॉ. राजपूत यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या मागण्यांचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना पटवून दिले.
चर्चेनंतर डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी सांगितले की, “माननीय मुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही भेट आमच्या समाजाच्या मागण्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी आमच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांचे आश्वासन आणि समजूतदारपणा यामुळे आमच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील, अशी आम्हाला आशा आहे.” मुख्यमंत्र्यांनी देखील डॉ. राजपूत यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. राजपूत यांच्यासोबत सुबोधसिंग आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते.



