जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘अलुम्नी सिरीज २०२५’ अंतर्गत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे “प्रतिबंधात्मक मार्ग: समुदाय सहभागातून आरोग्यदायी जीवननिर्मिती” या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या कार्यक्रमात समुदाय आरोग्याच्या मूलभूत तत्त्वांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या ऑनलाइन व्याख्यानासाठी श्री संभाजी कॉलेज ऑफ नर्सिंग, नांदेड येथील सहप्राध्यापिका लीना शिंगरे या मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी समुदाय सहभागाचे महत्त्व, आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना, लोकसहभागातून आरोग्यदायी समाजनिर्मितीचे घटक आणि आजच्या आरोग्यव्यवस्थेतील नव्या संकल्पना यांचे सविस्तर वर्णन केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी तज्ज्ञपणे उत्तरे देत समुदाय आरोग्य व्यवस्थेची कार्यप्रणाली अधिक स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे कन्व्हेनर आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग प्रमुख मिस्टर निर्भय मोहोड यांनी संपूर्ण आयोजन, नियोजन आणि समन्वय प्रभावीपणे पार पाडला. झूम मीटिंगद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सक्रिय चर्चा केली.
या व्याख्यानास प्राचार्या विशाखा गणवीर, उपप्राचार्या जेसिंथ धाया, प्रा. स्वाती गाडेगोणे, प्रा. दिवायना पवार, प्रा. आश्लेषा मून, प्रा. सुमित भरंबे आणि मिस्टर सचिन पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रम माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवर्धनासाठी उपयुक्त ठरल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी समाधानाने व्यक्त केले.



