Home क्राईम बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसुत्र लांबविले

बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसुत्र लांबविले


जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फत्तेपूर बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातील २५ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता फत्तेपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मीना प्रदीप अहीर वय ३८ रा. पिंपळगाव ता. जामनेर या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनिवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्या फत्तेपूर येथील बसस्थानकात कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुषार इंगळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound