यावल (प्रतिनिधी) सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांडातील पीडितांच्या भेटीला जात असतांना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच उत्तर प्रदेशातील वाढलेल्या संघटीत गुन्हेगारीच्या निषेधार्थ आज यावल येथे मोर्चा काढण्यात आला.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश राज्यातील सोनभद्र येथे जमीनीच्या वादातुन झालेल्या हिंसाचारात१० लोकांच्या मृत्यु झाला होता. तर या हिंसाचारात अनेक जण जख्मी झाले आहेत. प्रियंका गांधी यांनी हिंसाचारातील पिडीत जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपुस केली. त्यानंतर त्या त्या पिडीत कुटुंबियांच्या सदस्यांना भेटण्याससाठी जात असतांना मुख्यमंत्री आदीत्यनाथ योगी शासनाच्या सुचनेवरून प्रशासनाने प्रियंका गांधी यांना नारायणपुर येथे रोखून ठेवले. एवढेच नव्हे तर, प्रियंका गांधी यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेर्धात प्रियंका गांधी यांनी रस्त्यावरच योगी शासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. तसेच योगी शासनाचा निषेध केला.
हिंसाचार पिडीतांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश शासनाने कोणत्या कायद्यान्वये रोखले ? एखाद्या राज्यात जर लोकप्रतिनीधींना अशी वागणुक मिळत असेल, तर या राज्यात कायद्याचे राज्य आहे का? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ हे शासनाचा व आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे या घटनेवरून सिद्ध होते. उत्तर प्रदेश राज्यात भाजप शासनाच्य कार्यकाळ संघटीत गुन्हेगारी वाढल्याचे दिसुन येत आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेर्धात आज सकाळी ११ वाजता जिनिंग प्रेसिंग सोसायटी पासुन काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात येत तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामराव बाबुराव मोरे, चंद्रकांत देविदास इंगळे, भरत धनसींग चौधरी, विधानसभा क्षेत्रचे उपाध्यक्ष १ोखर पंढरीनाथ तायडे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फारशाह, शहराध्यक्ष कदीर खान करीम खान, अंनील निळकंठ जंजाळे, राजु पिंजारी, इमरान पहेवान यांच्यासह महीला आघाडीच्या तालुका भध्यक्ष पुष्पाताई झाल्टे, अनुसुचित जाती जमाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई ईंगळे, अशपाक शाह, कैलास सिताराम चौधरी, जयेश चोपडे, मनोहर गुरचळ, प्रविण पाटील, अरूण धना भालेराव, शेख साबीर शेख लाल, आंनद दामु तायडे, अनिल कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.