Home Cities भुसावळ वरणगाव नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत बदल; प्रभाग क्र.१० मधील ईव्हीएम नव्याने सेटिंगसाठी आदेश

वरणगाव नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत बदल; प्रभाग क्र.१० मधील ईव्हीएम नव्याने सेटिंगसाठी आदेश

0
135

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय समोर आला असून प्रभाग क्र. १० मधील दोन जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशांनुसार उद्या ईव्हीएमचे नव्याने सेटींग व सिलींग करण्यात येणार असून सर्व उमेदवारांना यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने, ज्या नगरपरिषदांमध्ये सदस्य पदासाठी दाखल अपिलांचा निकाल २२ नोव्हेंबर २०२५ नंतर घोषित झाला आहे, त्या जागांची निवडणूक ४ नोव्हेंबरच्या आधी घोषित कार्यक्रमाप्रमाणे न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत वरणगाव नगरपरिषद प्रभाग क्र. १० अ आणि १० क या दोन्ही जागांची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित करण्यात आली आहे.

या दोन्ही जागांबाबतचा न्यायालयीन निर्णय २५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राप्त झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नव्या आदेशानुसार निवडणूक पुढे ढकलण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक १० मधील सर्व मतदान केंद्रांवर वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्रांचे नव्याने सेटींग व सिलींग करणे आवश्यक झाले आहे.

उद्या, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता नगरपरिषद वरणगाव येथे संबंधित ईव्हीएमचे सेटींग आणि सिलींग प्रक्रिया पार पडणार आहे. नगराध्याक्ष पदाचे सर्व उमेदवार तसेच प्रभाग क्र. १० ब जागेचे उमेदवार यांनी या प्रक्रियेस उपस्थित राहावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरे यांनी कळविले आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडावी यासाठी प्रशासन सक्षम पावले उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound