Home क्राईम सौर उर्जा प्रकल्पाची डीसी केबलची चोरी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

सौर उर्जा प्रकल्पाची डीसी केबलची चोरी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

0
153


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार गावात बसविलेल्या सौर उर्जा प्रकल्पाची २५०० मिटर लांबीची डीसी केबल चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना रविवारी २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनीवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधि‍क माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बोरनार गावात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वयीत करण्यात आला आहे. रविवारी २३ नोव्हेंबर रात्री साडेअकरा वाजेनंतर सौर उर्जा प्लेटला जोडलेली १ लाख २० हजा रुपये किंमतीची २५०० मिटर लांबीची डीसी केबल चोरट्यांनी चोरुन नेली. तसेच सौर प्लेटला जोडलेले जंक्शन बॉक्स तोडून नुकसान केले. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघउकीस आल्यानंतर सुशिल सुनिल पाटील (वय २६, रा. लोणी, ता. जामनेर, ह. मु. प्रेमनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound