Home क्राईम धावत्या रेल्वेच्या धक्‍क्‍याने प्रौढाचा दुदैवी मृत्यू !

धावत्या रेल्वेच्या धक्‍क्‍याने प्रौढाचा दुदैवी मृत्यू !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुऱ्हाड गावातील रहिवाशी असलेले प्रौढाचा म्हसावद ते शिरसोली दरम्यानच्या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापु गणपत चव्हाण वय ५५ रा. कुऱ्हाड ता. जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद ते शिरसोली रेल्वे दरम्यानच्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने बापु चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्याच्या खिश्यात कागदपत्रावरून त्यांची ओळख पटविण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश वंजारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound