Home क्राईम सामाईक शेतीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाला मारहाण

सामाईक शेतीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाला मारहाण

0
115

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पडसोद गावातील शेत शिवारात सामाईक शेतीच्या वादातून एकाला मोठ्या भावाकडून शिवीगाळ करत काठ्यांनी मारहाण करून दुखापत केल्याची घटना गुरूवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील पडसोद गावातील रहिवाशी ताराचंद मंगल सोनवणे वय ५० सध्या नाशिक येथे वास्तव्याला आहेत. त्याच्या सामाईक शेतीच्या वादातून गुरूवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांचा मोठा भाऊ हिरामण मंगल सोनवणे, सुनंदाबाई हिरामण सोनवणे, बेबाबाई प्रल्हाद बाविस्कर या तिघांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच त्यांनी जिवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर ताराचंद सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound