Home क्राईम उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, दोन जण जखमी

उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, दोन जण जखमी

0
182

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नजीकच्या तळवेळ फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने पुढे जात असलेल्या ट्रकाला मागून धडक दिल्याने ट्रकचालक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्याला वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील तळवेल फाट्याजवळील उड्डाणपुलावर शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता एकाच दिशेने जात आलेल्या दोन ट्रकांमध्ये अपघात झाला आहे. पुढे जात असलेला सरकीने भरलेला ट्रक क्रमांक (जीजे ०३ बीव्ही ४५९५) वरील चालक रघुभाई लुढाभाई सोंडला आणि त्याचा सहकारी मगमालाल भाई सरवालीया दोन्ही राहणार सुरेंद्र नगर हे ट्रक घेवून जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून येणार ट्रक क्रमांक (जीजे १६ डब्ल्यू ८९०१) वरील चालक शिपाही असलम कादरभाई रा. राजकोट, गुजरात याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मागुन जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचालक शिपाही असलम कादरभाई रा. राजकोट, गुजरात आणि क्लिनर कालू शंकर कोरी रा. सुरेंद्र नगर हे दोन्ही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्या सुचनेनुसार पोलीस कॉन्स्टेबल मनोज म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी झालेले चालक व क्लिनर यांना तातडीने उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound