Home Cities यावल नवीन मीटर संदर्भात आ. हरिभाऊ जावळे यांची उर्जा मंत्र्यांशी चर्चा.

नवीन मीटर संदर्भात आ. हरिभाऊ जावळे यांची उर्जा मंत्र्यांशी चर्चा.

0
40

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । नवीन वीज मिटरमुळे ग्राहकांच्या असणार्‍या तक्रारींबाबत आमदार हरीभाऊ जावळे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली.

सध्या शहरस्तरावर नवीन मीटर बसविण्यात येत आहे.पण अनेक ठिकाणहून या मिटरच्या संदर्भात तक्रारी येत आहे.अवाजवी वीज बिल येत असल्याच्या तक्रारी अनेक नागरीकांनी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या कडे केल्या होत्या.या संदर्भातच आमदार हरीभाऊ जावळे यांनी रविवारी उर्जा मंत्र्यांची भेट घेतली.आमदार हरिभाऊ जावळे यांनी नवीन मीटर संदर्भात नागारीकांच्या येत असलेल्या तक्रारी उर्जा मंत्र्यांकडे मांडल्या आणि त्यावर योग्य तो मार्ग काढण्याची मागणी केली.जो पर्यंत बसवलेल्या नवीन मीटर संदर्भात नागरिकांचे समाधान होत नाही तो पर्यंत पुन्हा नवीन मीटर बसविण्यात येऊ नये अशी मागणी सुद्धा आमदार हरीभाऊ जावळे यांनी केली.

ना. बावनकुळे यांनी जर अश्या अडचणी येत असतील तर त्या संदर्भात चौकशी केली जाईल.मीटरचा एखाद लॉट खराब असेल तर ते त्या लॉट मधील बसवलेली मीटर बदलून दिले जातील अशी ग्वाही दिली. आमदार हरिभाऊ जावळे आणि उर्जा मंत्री यांच्यात या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आणि उर्जा मंत्र्यांनी त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. याप्रसंगी वीज वितरण खात्याचे अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound