जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल साई गार्डन च्या बाहेर डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्या सारख्या हत्याराने वार करुन शाहुनगरातील एका तरुणाला गंभीर जखमी करण्यात आले होते. रविवार २७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत तालूका पोलिसांनी तिन संशयीतांची नावे निष्पन्न करुन एकाला सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहूनगर येथील रहिवासी सय्यद जावेद सय्यद अजीज (वय- ३०), याकूब खान दाऊद खान ( वय-४०) असे मित्रांसोबत २७ ऑक्टोबर रोजी जेवणाला गेले हेाते. जेवण अटोपल्यावर घरी जाण्याच्या तयारीत असतांना राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल साई गार्डन च्या बाहेर दोन मोटरसायकलवर आलेल्या चार तरुणांनी डोळ्यात मिरची पूड टाकून. झोंबाझोंबी करत लुटण्याचा प्रयत्न केला काही हाती न लागल्याने धारदार कोयत्याने हल्ला चढवला होता. या हल्ल्यात सय्यद जावेद सय्यद अजिज याच्या पाठीवर डोक्यापासून ते कमरेपर्यंत मोठी जखम होवून त्यास तातडीने त्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून ४० टाके घेण्यात आले असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर तालूका पोलिसांत प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात येवुन अज्ञात मारेकर्यांचा शोध सुरु होता. उपनिरीक्षक विजय पाटिल यांच्यासह गुन्हेशोध पथकाने वीस दिवस सलग तपास करुन या गुन्ह्यात तौसिफ ऊर्फ चरबी सैय्यद आसिफ (रा.पिंप्राळा हुडको आझाद नगर) याला अटक केली असून या गुन्ह्यात इम्मा ऊर्फ इम्रान भिस्ती (रा.शाहूनगर) याच्यासह तांबापुरातील डेअरींग नावाचा एक तरुण अशांनी हा हल्ला घडवुन आणल्याचे उघडकीस आले आहे. फरार दोन्ही संशयीतांचा पोलिस शोध घेत आहे.




