Home Cities जळगाव माजी जिल्हाप्रमुख निलेश पाटलांचा राजीनामा : शिवसेनेतील कलहाचा उद्रेक !

माजी जिल्हाप्रमुख निलेश पाटलांचा राजीनामा : शिवसेनेतील कलहाचा उद्रेक !

0
407

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपुर्द केला असून ते लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

आधी राष्ट्रवादीत गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक असलेले निलेश पाटील यांनी मध्यंतरी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. त्यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून काढून सहसंपर्क प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. यातच पक्षाच्या कार्यक्रमाला आपल्याला बोलावण्यात येत नसल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.

या पार्श्वभुमिवर, निलेश पाटील यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाठविला असून ते लवकरच दुसऱ्या पक्षात दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ते नेमके कुठे जाणार ? हे स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound