
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मावशीकडे भेटण्यासाठी आलेली गुजरात येथील २१ वर्षीय तरूणी ही अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातून सोमवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.हर्षदा प्रविण कंखरे (वय २१ रा. वापी जि. बलसाड राज्य गुजरात) असे बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात तरूणीची मावशी राहते. तिची मावशी आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी हर्षदा ही तरूणी काही दिवसांपासून मांडळ येथे आलेली होती. सोमवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तरूणीने घरात कुणाला काहीही न सांगता ती कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील हे करीत आहे.



