Home Cities अमळनेर बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी !

बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील धार गावाजवळील चिन्मय हॉम्टेल जवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गयासोद्दिन बद्रोद्दिन मुजावर वय ६८ रा. धार ता. अमळनेर हे त्यांचे दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएफ ६३५३) ने शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अमळनेरकडून धार येथे जात असतांना चिन्मय हॉटेल जवळ समोरून येणारी बस क्रमांक (एमएच २० बीएल १४३०) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गयासोद्दिन मुजावर हे गंभीर जखमी झाले. त्याच्यावर अमळनेर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शनिवारी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात बस चालक बापू भगवान ठाकूर रा. तांबेपूरा, अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound